Chandrakant Patil | यापेक्षा आपल्या विचारांवर मास्क लावला तर… – सचिन सावंतांचा चंद्राकांत पाटलांना सल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) सध्या तोंडाला मास्क आणि प्लॅस्टिकचे फेसशील्ड लाऊनच फिरत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर समता सैनिक दलाच्या युवकांनी शाईफेकली होती. तेव्हापासून त्यांनी ही खबरदारी घेतली आहे. त्यावर आता त्यांना काँग्रेसच्या नेत्याने दिला आहे. चंद्रकांत पाटलांनी आपल्या विचारांवर मास्क लावला, तर अधिक हितकारक असेल, असे मला वाटत असल्याचे सचिन सावंत म्हणाले.

 

सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा पिंपरी चिंचवड येथील एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात सावंत लिहितात, यापेक्षा आपल्या विचारांवर मास्क लावला, तर अधिक हितकारक असेल असे मला वाटते. विचार तत्वाधिष्टीत असेल, तर धैर्याची जोड आपसूकच मिळते. मग कोणत्याही संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळते. सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी शाळा काढली, तेव्हा चिखलफेकीचा सामना केला होता. पण पदराने ही त्यांनी कधी तोंड झाकले नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा काढल्या. पण त्यांना शासनाने कोणतेही अनुदान दिले नाही. त्यांनी अक्षरक्ष: भीक मागून आपल्या शाळा चालविल्या, असे पाटील म्हणाले होते.
शाळांना आणि महाविद्यालयांना देण्यात येणाऱ्या अनुदानावरून ते बोलत होते.
त्यांच्या या विधानावर महाविकास आघाडी आणि विविध सामाजिक संघटनांनी आक्षेप घेतला.
त्यातून त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.
चंद्रकांत पाटील यांनी याप्रकरणी माफी देखील मागितली होती.
परंतु, चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा शाईफेकण्याची धमकी देण्यात आली आहे.
त्यामुळे त्यांनी काळजी घेणे सुरू केले आहे. तसेच त्यांची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याने समाज माध्यामावर (फेसबूक) ही धमकी दिली होती.

 

 

 

Web Title :- Chandrakant Patil | rather than this it would be more beneficial to put a
mask on your thoughts sachin sawants criticism of chandrakant patil

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा