फडणवीसच पुन्हा CM, PM मोदींसमोरच चंद्रकांत पाटलांनी सांगितलं, मग शिवसेनेचा पत्‍ता कट काय ?

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील असा विश्वास चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला. आता पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री होतील आणि सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा विक्रमही ते मोडतील, असेही विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ते यावेळी नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. या सभेला पंतप्रधान मोदी उपस्थित होते.

शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट केलं जात आहे. त्यामुळे आता युतीच्या घोषणेआधीच मुख्यमंत्रीपदावर भाष्य करत स्पष्टीकरण दिले.

जर युतीमध्ये सेनेला समान जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटेल असे विधान करुन दिवाकर रावते यांनी खळबळ उडवून दिली. शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीचा फॉर्म्युला अद्यापही ठरलेला नाही, त्यावर दिवाकर रावते यांनी प्रतिक्रिया दिली होती, त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी देखील रावतेंना समर्थन दिले.

संजय राऊत म्हणाले की भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत आधी 50 – 50 चा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. त्यामुळेच दिवाकर रावते यांनी जे सांगितले त्यात काही चूकीचे नाही.

भाजप सेना युती तुटणार असल्याची चर्चा आहे, युतीवर अजूनही प्रश्न चिन्ह आहे. जागा वाटपावरुन भाजप सेनेत वाद आहेत. फॉर्म्युला वाटपात समसमान जागा मिळणार की शिवसेनेला भाजप 115 ते 120 मतदार संघ सोडणार यावर अजूनही स्पष्टता नाही.

Visit – policenama.com