सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का ? : चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एका वर्षाच्या कालावधीत सरकारवर विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणात टीका केली असून, वारंवार सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु सरकार अजूनही शाबूत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजपचे ( BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandraknt Patil) यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक झडली आहे. पुण्यात एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केलं. यावेळी बोलताना “शेतकऱ्यांना न्याय आणि महिलांचं शिक्षण यासाठी महात्मा फुले यांनी आयुष्यभर काम केले आहे. मात्र, आजही ते काम पूर्ण झालेलं नाही. गेल्या वर्षभरात सरकारने यात काहीच काम केलं नाही. ते काम व्हावं हीच त्यांना आदरांजली ठरेल. तसेच महात्मा फुलेंना भारतरत्न मिळावा अशी आमची मागणी असल्याचे म्हटले आहे. यावेळी पत्रकारांनी संजय राऊत यांच्याविषयीओ विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ”संजय राऊत यांच्या प्रतिभेपुढे माझ्यासारखा सामान्य माणूस काय बोलणार?,” असा टोला त्यांनी लगावला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी( Narendra Modi) आज राज्य सरकारचं कौतुक करण्यासाठी पुण्यात येत आहेत,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यांच्या या विधानाचा संदर्भ देत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले,”त्या स्वप्नात आहेत का? अशी खोचक टीकादेखील पाटील यांनी केली. दरम्यान, राज्य सरकारवर टीका करताना “राज्य सरकार अपयशी ठरले आहे. गोंधळलेले आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. आरक्षण असो, वा आणखी काही कुठल्याच विषयाबाबत हे सरकार खात्री देत नाही,” अशी टीका पाटील यांनी केली.

You might also like