Chandrakant Patil | शहरातील रस्ते तातडीने दुरुस्त करावेत; चंद्रकांत पाटलांचे पुणे महापालिका आयुक्तांना पत्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | सध्या सर्वत्र पावसाची रिपरिप होत आहे. त्यामुळे पुणे (Pune) शहराच्या सखल भागात पाणी साचले आहे. तर अनेक ठिकाणावरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची दैणा होत आहे. दरम्यान, शहरातील 90 टक्क्यांहून अधिक खड्डे बुजवल्याचा दावा पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation-PMC) करण्यात आला आहे. पण, शहरातील वास्तव वेगळेच दिसून येतेय. या पार्श्वभूमीवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शहरातील रस्ते तातडीने दुरुस्त करावेत याबाबतचे पत्र महापालिका आयुक्तांना पाठविले आहे.
‘शहरासह कोथरूड मधील रस्त्यांचीही मोठी दुरवस्था झाल्याने ते तातडीने दुरुस्त करावेत,’ अशी मागणी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (Vikram Kumar) यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झालीय, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ते खचल्याचे देखील दिसत आहे.
पत्रात म्हटलं आहे की, मुसळधार पावसाने छत्रपती शिवाजी महाराज चौक, भेलकेनगर चौक, राहुलनगर, नवीन शिवणे,
कर्वे रस्ता, आशिष गार्डन परिसर, गुजरात कॉलनी परिसर, नळस्टॉप चौक (एसएनडीटी चौक-कॅनॉल रोड), पौड फाटा,
सदानंद हॉटेलसमोरील बाजू, एनडीए चौक, लोहिया जैन आयटी पार्क, कोथरूड डेपो, मातोश्री वृद्धाश्रमजवळील रस्ता,
पौड रोड, आनंदनगरसमोरील बाजू यांसह विविध भागांतील रस्ते मोठ्या प्रमाणात खचले आहेत.
याशिवाय काही ठिकाणी सिमेंट रस्त्यालगतचे डांबरी रस्ते खचून असमान झाले आहेत, त्यामुळे रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी असं म्हटलं आहे.
Web Title :- Chandrakant Patil | roads in pune city should be repaired immediately
bjp leader chandrakant patil letter to pune municipal commissioner
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Aurangabad Crime | औरंगाबादमधील धक्कादायक घटना ! विजेचा शॉक लागून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू
- Maharashtra Rains Update | राज्यात काही भागात ‘धो-धो’ पाऊस; अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत, पावसामुळे शेती पिकांचेही नुकसान
- NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त; शरद पवारांचा मोठा निर्णय