Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्याची ओळख पटली

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (BJP) नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्य़क्रमासाठी आले असताना त्यांच्यावर शाईफेक (Ink Throwing) करण्यात आली. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) तात्काळ ताब्यात घेतले आहे. शाईफेक करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. मनोज गरबडे (Manoj Garbade) असे या व्यक्तीचे नाव आहे. तो आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून पिंपरी-चिंचवडमध्ये ओळखला जातो.

 

मनोज हा समता सैनिक दलाचा (Samata Sainik Dal) कार्य़कर्ता असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान, मनोजच्या सोबत विजय धर्मा ओव्हाळ (Vijay Dharma Oval) आणि धनंजय ईचगज (Dhananjay Eichgaj) या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. मनोज गरबडेनं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या तोंडावर शाई फेकली आणि तिथं घोषणाबाजीदेखील केली. त्यानंतर लगेच त्याला ताब्यात घेतलं. दरम्यान, मनोज गरबडेच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट सुरू झाल्या आहेत. अनेकजण त्याच्या समर्थनार्थ पुढे येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

शाईफेकीनंतर काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी सर्व कार्यक्रम करणार आहे. मी कुणाला घाबरत नाही. अशा प्रकारे पराचा कावळा करणं, दिलगिरी व्यक्त केली असताना असा भ्याड हल्ला करणं चुकीचं आहे. हिंमत असेल तर समोरून या. सगळं पोलीस डिपार्टमेंट बाजूला करतो, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, ही झुंडशाही आहे. ही झुंडशाही महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) सहन करणार नाही. याचं जे काही आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाहतील. आज आम्ही आमच्या कार्य़कर्त्यांना खुली छुट दिली असती तर काय झालं असतं. मात्र, ही आमची संस्कृती नाही. शब्दाला शब्दाने टक्कर देता येते. मी काल आणि आजही दिलगिरी व्यक्त केली. गिरणी कामगाराचा मुलगा या स्टेजपर्यंत जाणं सरंजामी लोकांना झेपत नाही. त्यामुळे हे भ्याड हल्ले चालले आहेत. उद्यापासून पोलीस प्रोटेक्शनही नसेल, हिंमत असेल तर या समोर.

 

हे चुकीचे पायंडे पडलेले आहेत. पोलिसांना दोष देण्याचे कारण नाही. पोलिसांनी कुणाकुणावर लक्ष द्यायचं.
कार्य़कर्ता कोण आणि बदमाश कोण हे कळणार कसं. देवेंद्रजींनाही (Devendra Fadnavis) मी सांगितलं आहे की,
कुणावरही कारवाई करू नका. मी सर्व कार्यक्रमाला जाणार आहे. बघू कोण काय करतंय, या समोर.
हा बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा अपमान आहे.
पैठणमध्ये जे बोललो त्याचा विपर्य़ास केला आहे. मात्र, पराचा कावळा केला गेला,
लोकसहभागातून शाळा उभारल्या असं म्हणण्याऐवजी मी ग्रामीण भाषेत बोललो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

Web Title :- Chandrakant Patil | samta sainik dal manoj garbade throwing ink on chandrakant patil pimpari chinchwad pune controversial statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Lonavala Local | कामशेत स्थानकाच्या कामामुळे पुणे लोणावळा मार्गावरील अनेक लोकल रद्द

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ९५,०००!; मोदी सरकारची नववर्षातील भेट

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 89 जणांवर कारवाई