हिंदूंच्या मतांप्रमाणेच देश चालणार : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशामध्ये बहुसंख्य हिंदू रहात असल्याने त्यांच्या मतांप्रमाणे देश चालणार आहे. अधिकारी हिंदू आहे, त्यांनाही सण आहे. प्रशासन तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही. त्यामुळे गणेश मंडळांनी केलेल्या मागण्यासंदर्भात प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढू असे आश्वासन पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी भाजपाच्या नवनियुक्त शहराध्यक्षा माधुरी मिसाळ, महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, आमदार योगेश टिळेकर यांच्यासह संस्थानचे अध्यक्ष अशोक गोडसे उपस्थित होते.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, गणेशोत्सव काळामध्ये अनेक ठिकाणाहून नागरिक देखावे पाहण्यासाठी येत असतात. त्यांना देखाव्यांचा आनंद घेता यावा यासाठी वेळ वाढवून देण्याचा आणि विसर्जन मिरवणुकीत रात्रभर वाद्य वाजवण्याची मागणी गणेश मंडळांकडून केली जात आहे. या मागणीवर प्रशासनाशी चर्चा करून त्यातून कायदेशीर आणि व्यावहारिक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like