Chandrakant Patil । चंद्रकांतदादांचा राऊतांना टोला; म्हणाले – ‘शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा’

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – (policenama online) – शिवसेना (shiv sena) आणि भाजपाची (BJP) युती नैसर्गिक आहे. त्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोललं पाहिजे. त्यांनी शरद पवारांच्या पे-रोलवर (Pay roll) राहून बोलण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडाव्यात, असा जोरदार निशाणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर साधला आहे. चंद्रकांत पाटील हे (Chandrakant Patil) आज (22 जून) रोजी पालघर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पाटील (Chandrakant Patil) यांनी माध्यमांशी सवांद साधला. (Explain the plight of Shiv Sainiks instead of staying on Sharad Pawar’s pay roll)

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लगावला आहे. त्यावेळी ते म्हणाले, शरद पवारांच्या (Sharad Pawar) पे रोलवर (Pay roll) राहून पवारांची बाजू घेण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडल्या पाहिजे. आम्हाला हिंदुत्व पाहिजे. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्ही आहोत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी आम्हाला तोच संदेश दिला आहे. पूर्वीच्या युतीत आम्ही समाधानी होतो. आताची युती नैसर्गिक नाही, अशा शिवसैनिकांच्या व्यथा भावना राऊतांनी (Sanjay Raut) मांडल्या पाहिजेत.

आज दिल्लीत होत असलेल्या शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठकाणीवरून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी निशाणा साधला आहे.
काँग्रेस, पवार कोण काय कधी करेल सांगता येत नाही.
कोण कुणाला भेटतंय ते कळत नाही.
देशाच्या राजकारणात काय चालंलय ते समजण्याच्या पलिकडे आहे, असा त्यांनी टोला लगावला.
तसेच, ते म्हणाले, केंद्रीय एजन्सी त्रास देत असल्याचं प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांचं म्हणणं आहे.
मात्र, काही तरी घडल्याशिवाय कोणी त्रास देत नाही.
आमच्याही कार्यकर्त्यांना त्रास झालाच आहे, असे देखील पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं.

दरम्यान, पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आता सर्वच आमदारांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहे. म्हणून आता होणारे अधिवेशन पूर्ण कालावधीचं असले पाहिजे अशी मागणी करत, या अधिवेशनात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणावर चर्चा झालीच पाहिजे. शेतकरी देखील नैसर्गिक आपत्तीमुळे खचून गेलाय या विषयावरही चर्चा झाली पाहिजे असं स्पष्ट मत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केलं आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Chandrakant Patil says that Sanjay Raut needs to hear what Shivsainik says

हे देखील वाचा

Income Tax Department | इन्कम टॅक्स अलर्ट ! ताबडतोब करा ‘हे’ काम, अन्यथा रखडू शकते तुमची ‘सॅलरी’, जाणून घ्या

New Gas Stove | 10 लाखापेक्षा जास्त घरांमध्ये नैसर्गिक गॅसने पेटतात चूली; विजेच्या वापर कमी करतो ‘हा’ नवीन गॅस स्टोव्ह, जाणून घ्या काय आहे खास