Chandrakant Patil | ‘शरद पवारांनी नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला’, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – समाजात जातीयवाद निर्माण (Create Casteism) करण्याचा शरद पवारांचा (Sharad Pawar) प्रयत्न नेहमीच राहिला आहे. कधी ते मराठा (Maratha) विरुद्ध नॉन मराठा (Non Maratha) असा विषय सुरु करतात तर कधी अल्पसंख्याक (Minority) विरुद्ध नॉन अल्पसंख्याक असा वाद सुरु करताता, अशा शब्दांत भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी हल्लाबोल केला. आज चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शहरातील विविध प्रश्नांवर पुणे महापालिका आयुक्तांची (Pune Municipal Commissioner) भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर भाष्य केले. शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना पाटील म्हणाले, गेल्या 50 वर्षापासून शरद पवारांचे सुरु असलेलं राजकारण (Politics) सर्वांना माहीत आहे. त्यामुळे मुस्लिम समाजालाही (Muslim Community) हे माहीत आहे की हे सर्व मतांसाठी सुरु आहे. त्यामुळे याला रिसीयस घेत नाहीत, असंही पाटील म्हणाले.
—
ते पुढे म्हणाले, काँग्रेसकडे (Congress) टीका करण्यासाठी विषय नाहीत म्हणून अर्थहीन चर्चा करत असतात. आमचा येणाऱ्या माहापालिकेत मुद्दा हाच आहे. 50 वर्ष विरुद्ध 5 वर्षे असा फॉर्म्युला आहे. आम्ही काय केलं हे सांगू, तुम्ही काय केलं ते सांगा, असेही ते म्हणाले. जे गलिच्छ बोलतात त्यांना परवानगी आणि मी तर सुसंकृत (Cultured) बोलतो, नाव न घेता असा टोला त्यांनी राऊतांना (Sanjay Raut) लगावला आहे. छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) दोन वर्षे जेलमध्ये कोणी भेटायला पण जात नव्हते. शरद पवार नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करत असतात, त्यांचा तसा प्रयत्न असतो असा आरोप पाटील यांनी केला.
Web Title :- Chandrakant Patil | sharad pawar always tried to create casteism in the society said chandrakant patil in pune
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update