‘चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजाची दिशाभूल करू नये’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ब्राह्मण समाजाविषयी तुमचा असलेला कळवळा हे पुतना मावशीच प्रेम आहे आणि ते आता समाजाच्या लक्षात आलेले आहे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजास गृहीत धरू नये व त्यांची दिशाभूल करू नये. अशा शब्दात शहर शिवसेनेने टीका केली आहे.

गेली ७० वर्ष बहुतांशी ब्राह्मण समाज भाजपच्या मागे उभा होता. परंतु सातत्याने रेटून खोटे बोलून समाजाला फसवण्याच्या पलिकडे आपण त्यांना काही दिले नाही. त्यामुळे समाज आज अस्वस्थ आहे आणि तो शिवसेनेकडे सरकतो आहे. या भितीपोटी ब्राह्मण समाजाला पुन्हा एकदा फसविण्याचा प्रयत्न करीत आहात, असे सेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, शाम देशपांडे, प्रशांत बधे, आनंद दवे आणि शिरीष आपटे यांनी पत्रकात म्हटले आहे. ‘पाटील हे ब्राह्मण समाजाच्या काही मंडळींना भेटून ‘मागच्या सरकारमध्ये ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत म्हणून ‘अमृत’ नावाने महामंडळ प्रस्थापित होते. महामंडळाचे नाव निश्चित झाले आणि महाविकास आघाडीचे सरकार आले आणि हा प्रस्ताव बारगळला, अशी खोटी माहिती पसरवीत असल्याचा आरोप शिवसेनेने पत्रकाद्वारे केला आहे.