शरद पवार यांचे सर्व बालेकिल्ले भाजपने उद्वस्त केले : चंद्रकांत पाटील

सांगली : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत भाजप बारामतीची जागा जिंकणारच असा आत्मविश्वास व्यक्त करणारे भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना पिंगा घालायला लावला असे खळबळजनक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील कार्यक्रमात केले.

आम्ही शरद पवारांचे सर्व बालेकिल्ले उध्वस्त केले असून लोकसभा निवडणुकीत आम्ही पवारांना जेरीस आणले, मात्र थोडक्यात बारामतीची जागा जिंकण्यापासून राहिलो मात्र पवारांना बारामतीच्या बाहेर पडून न देता तिथेच पिंगा घालायला लावला, असेदेखील यावेळी बोलताना ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी बोलताना काँग्रेसवर देखील टीका केली.

काँग्रेस समाजात फूट पाडत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. भाजप बाबतीत देखील लोकांच्या मनात गैरसमज पसरवण्याचे काम काँग्रेसने केल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. त्याचबरोबर बहुजन
समाजाचे त्यांनी मोठ्या प्रमाणात खच्चीकरण केल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

दरम्यान, या कार्यक्रमाला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेनंतर आता काँग्रेस यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त

एनर्जी ड्रिंक्समुळे उर्जा खरंच वाढते का ? जाणून घ्या सत्य

चेहऱ्यावरील बदलांमुळे मिळतात ‘या’ आजारांचे संकेत

पाय मुरगळलाय ? ‘हा’ घरगुती उपाय केल्यास मिळेल आराम

मधात भिजलेले बदाम खा आणि रहा ‘निरोगी’

Loading...
You might also like