चंद्रकांत पाटलांचा ‘महाविकास’वर निशाणा, म्हणाले – ‘मी खुर्चीत बसतो, सत्ता चालवण्याचं कंत्राट तुम्ही घ्या, पवार-ठाकरेंमध्ये करार झाला असवा’

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Bacchu Patil) यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. कदाचित मी खुर्चीत बसतो. तुम्ही सत्ता चालवण्यांच कंत्राट घ्या असं उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना सांगितलं असे. त्यांच्यात तसा करार झाला असेल अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. वाढीव वीजबिलासंदर्भात त्यांनी ही भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी त्यांना शरद पवार यांना भेटण्याच सल्ला दिला. यााबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यपालांनी काय सांगितलं हे मला माहित नाही. ते कोणत्या हेतूनं बोलले हेही मला माहित नाही. त्यामुळं त्यावर बोलता येणार नाही. परंतु मला जर विचाराल तर सध्या शरद पवारच राज्य चालवत आहेत. तेच बाहेर फिरत आहेत. उद्धव ठाकरे फिरतच नाहीत. त्यामुळं राज्यपालांनी तसं सांगितलं असेल” असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला

पुढं बोलताना ते म्हणाले, “सध्या लोकांना शरद पवार आणि विरधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सहज उपलब्ध होतात. त्यामुळं उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचं अशी लोकांची भावना झाली आहे. ही वस्तुस्थिती आहे. मी फक्त खुर्चीत बसतो. सत्ता चालवण्याचं कंत्राट तुम्हाला घ्या असा करार ठाकरे-पवारांमध्ये झाला असावा” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.