‘ठाकरे सरकारनं प्रत्येक गोष्टीचं खापर केंद्रावर फोडू नये’ : चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारनं प्रत्येक गोष्टीचं खापर केंद्रावर फोडू नये अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जीएसटीची थकबाकी आलेली नाही. त्याचा परिणाम अर्थसंकल्पावर होऊ शकतो असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. राज्य सरकारनं जबाबदारी झटकू नये. प्रत्येक गोष्टीचं खापर केंद्रावर फोडू नये असं ते म्हणाले आहेत.

पुढं बोलताना पाटील म्हणाले, केंद्रीय अर्थ मंत्रालयानं 28 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांना जीएसटी परताव्याची रक्कम वितरीत केली आहे. यापैकी महाराष्ट्राला मिळालेली जीएसटीची रक्कम ही दुसऱ्या क्रमांकाची आहे. त्याचप्रमाणे 2019-20 मध्ये केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक जीएसटी परताव्याची रक्कम देण्यात आली आहे असा दावा पाटील यांनी केला आहे.

राज्याचा दिवस गतिमान करावा
पाटील असंही म्हणाले, केंद्राकडून आलेली जीएसटीची रक्कम महाविकास आघाडी सरकारनं ही रक्कम कोविडच्या उपाययोजना आणि राज्यातील विकास कामांना गती देण्यासाठी वापरावी. जीएसटीच्या थकबाकीचं कारण आता पुढं करू नये.