युतीची काळजी करू नका, लवकरच संयुक्त पत्रकार परीषदेत जाहीर करू : चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेसोबत युतीची काळजी करू नका. लवकरच संयुक्त पत्रकार परीषदेत जाहीर करू असे स्पष्ट करत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब केले.

पुण्यातील ढगफुटीच्या दुर्घटनेनंतर आज पाटील यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. खासदार गिरीश बापट, शहर अध्यक्ष माधुरी मिसाळ, महापौर मुक्ता टिळक, आमदार दिलीप कांबळे, भीमराव तापकीर, मुरलीधर मोहोळ याप्रसंगी उपस्थित होते.

राज्यातील निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारी निश्चिती, युतीतील जागावाटप आदी गोष्टींवर भाजपची काल दिल्लीत बैठक झाली. वरिष्ठ नेत्यांसोबत 8 तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. बैठीतील निर्णयासंदर्भात पाटील यांना पत्रकार परिषदेत युतीबाबत विचारणा करण्यात आली.

पाटील म्हणाले, युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे, काळजी करू नका. लवकरच भाजप सेना नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्यात येईल.

Visit : policenama.com