×
Homeताज्या बातम्याChandrakant Patil | 'त्या' विद्यार्थ्यांची पदवी आणि पदव्युत्तरपर्यतची फी राज्य सरकार भरणार...

Chandrakant Patil | ‘त्या’ विद्यार्थ्यांची पदवी आणि पदव्युत्तरपर्यतची फी राज्य सरकार भरणार – चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे (Corona) दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा आता जो कोर्स (अभ्यासक्रम) आहे (उदा. मेडीकल (Medical), इंजिनिअरींग (Engineering) किंवा इतर कोणताही) तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत पूर्ण शुल्क (Fee) राज्य शासन (State Govt) भरेल. त्यासाठी कोणताही वेगळा निर्णय करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना ही माहिती दिली.

 

कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याच्या निर्णयाबद्दल शासनाने कोणती कार्यवाही केली. याबाबत सदस्य शिरीष चौधरी (Shirish Chaudhary) यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) बोलत होते.

 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व
पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण फी माफ करण्याबाबत सर्व अकृषी विद्यापीठांना निर्देश देण्यात आलेले आहेत.
आतापर्यंत 931 पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी, 200 पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी आणि 228 पदव्युत्तर
अभ्यासक्रमातील विद्यार्थी यांना 2 कोटी 76 लाख 84 हजार 222 रक्कम वितरित करण्यात आली आहे,
अशी माहिती पाटील यांनी विधानसभेत दिली.

 

Web Title :- Chandrakant Patil | Students whose both parents died due to Corona will pay the fee till the completion of the course – Chandrakant Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | इंजिनिअर पतीवर काळी जादू केल्याप्रकरणी उच्चशिक्षित पत्नीविरुद्ध फौजदारी गुन्हा

 

Vinayak Mete Accident | विनायक मेटेंना अपघातानंतर वेळेवर मदत का मिळाली नाही? फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती

 

CM Eknath Shinde | ‘देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, ‘करुणा’ दाखवली’ – एकनाथ शिंदे

Must Read
Related News