उदयनराजेंना पाडण्यासाठी ‘या’ नेत्याने दिला अजब सल्ला

वाई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर झाली. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसा प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. साताऱ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात लढत आहे. उदयनराजेंना पाडण्यासाठी नरेंद्र पाटील यांचा प्रचार कसा करावा याबाबत सांगताना राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला आहे.

महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या वाई येथील प्रचार सभेत चंद्रकांत पाटील म्हणाले की, रात्री घरी जाताना एक खडू घेऊन जा आणि आपल्या घरातल्या भिंतीवर ‘धनुष्यबाणाचे चिन्ह काढा आणि त्याच्याखाली लिहा उदयनराजे हरू शकतात, मी त्यांना हरवणारच’ मग बघा कशी एनर्जी येते आणि रोज घरातून बाहेर पडताना भाजप आणि शिवसेनेचा बॅच खिशाला लावूनच घराबाहेर पडायचं.

या सभेत चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरही टीका केली. शेवटच्या दिवशी शरद पवार बारामतीत सभा घ्यायचे आता तेच शरद पवार आपल्या मुलीसाठी मतदारसंघात चार-चार सभा घेत आहेत, असेही ते म्हणाले.

सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार विद्यमान खासदार उदयनराजे भोसले आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी महायुतीने नरेंद्र पाटील या राष्ट्रवादीच्याच माजी आमदाराची निवड केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like