Chandrakant Patil | ‘…तर विधानसभेला शिवसेनेच्या फक्त 5 जागा आल्या असत्या’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही दगा दिला नाही. आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या फक्त 5 जागा आल्या असत्या, असं जोरदार विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. नांदेड (Nanded) येथील (Nanded) देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणूक संदर्भात आयोजित कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील आले होते. त्यावेळी पाटील यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) हल्लाबोल केला आहे.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपा आणि शिवसेना (BJP and Shiv Sena) युतीला निवडून दिलं. महाविकास आघाडीला निवडलं नाही. युती केली नसती तर भाजपाचे (BJP) 144 आमदार निवडून आले असते, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसंच, ‘युतीत तुम्ही आम्हाला धोका दिला म्हणून आमचे 20 आमदार पडले आम्ही धोका दिला असता तर तुमच्या फक्त 5 जागा आल्या असत्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘मागच्या निवडणुकीत सर्वात जास्त मते भाजपाने (BJP) घेतली होती.
124 जागा लढवून देखील आमचे 105 आमदार आले. अपक्ष आमदार सुद्धा आमच्या संपर्कात होते.
पंरतु, उद्धव ठाकरे यांचं सरकार येणार असल्याचे समजल्याने ते आमदार तिकडे गेले, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Chandrakant Patil | ‘… then Shiv Sena would have got only 5 seats in the assembly’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update