Chandrakant Patil vs Sanjay Raut | चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला; म्हणाले – ‘दिवा विझण्यापूर्वी फडफडतो’ (व्हिडिओ)

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil vs Sanjay Raut | मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप – प्रत्यारोप पहायला मिळत आहे. याच दरम्यान भाजप (BJP) आणि शिवसेनेतील (Shivsena) वाद पुन्हा समोर आला आहे. संजय राऊतांवर (Sanjay Raut) बोलायचं नाही असं आम्ही ठरवलंय. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो. आपल्याला वाटत दिवा फार मोठा झाला पण तो विझण्याच्या दिशेने जात असतो अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संजय राऊत यांच्यावर केली. चंद्रकांत पाटील आज कोल्हापूरमध्ये (Kolhapur) पत्रकार परिषदेत बोलत होते. (Chandrakant Patil vs Sanjay Raut)

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राऊत यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही. कारण त्यांना बोलूनच मोठं करण्यात आले आहे. ते रोज सकाळी प्रवचन देतात. माध्यमं ते फ्लॅश करतात. त्यामुळे त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या. कारण दिवा विझण्यापूर्वी फडफडत असतो. तो दिवा फार मोठा झाला असं वाटतं मात्र तो विझण्याच्या दिशेने जात असतो, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यामुळे निवडणूक (Election) तिरंगी होईल की दुरंगी होईल हे माहीत नाही, असे सांगत पंढरपूर पॅटर्न (Pandharpur Pattern) राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Chandrakant Patil vs Sanjay Raut)

 

मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांचे उपोषण संपल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांना सरकारने दिलेल्या वेळापत्रकासाठी त्यांचा पाठपुरावा घेण्याचा सल्ला दिला होता. परंतु, त्यानंतर आता पुन्हा एकदा सरकारकडून ते वेळापत्रक मागे पडत आहे. आरक्षणाविषयी असलेल्या मागण्यासंदर्भात सवालही केले आहेत. मात्र, त्यावर काहीही उत्तर मिळालेलं नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा अधिवेशनात उचलून धरणार असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.

 

Web Title :- Chandrakant Patil vs Sanjay Raut | chandrakant patil criticized sanjay raut in kolhapur

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा