Chandrakant Patil | ‘या’ चुकीमुळे पुणेकरांना चार महिने पुरेल एवढ्या पाण्याची होतेये गळती, पालकमंत्र्यांचा खुलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | पुणे शहरात नुकताच दर गुरूवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात वितरण प्रणालीमुळे तब्बल चार टीएमसी पाण्याची जलवाहिन्यांतून गळती होत असल्याची धक्कादायक बाब पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी समोर आणली आहे. पुणे (Pune) शहरासाठी वर्षाला ११ अब्ज टीएमसी (TMC) पाणी मंजूर आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिकाकडून (Pune PMC News) २० टीएमसी पाण्याचा वापर केला जातो. म्हणजेच शहराला चार महिने पुरेल, एवढे पाणी खराब वितरण प्रणालीमुळे (Poor Distribution System) वाया जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील विविध प्रकल्पांचे उदघाटनाप्रसंगी पालकमंत्री पाटील (Chandrakant Patil) बोलत होते. ते म्हणाले, की पुण्याच्या पाणी वितरणात मोठ्या प्रमाणात गळती असल्याने समान पाणीपुरवठा योजना (Equal Water Supply Scheme) राबवण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत ८५ टाक्यांचे नियोजन असून त्यापैकी ६० टाक्यांचे काम पूर्ण झाल्या आहेत. जायका प्रकल्पांतर्गत (JICA Project) ११ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) झाल्यानंतर यातून पुनर्वापर केलेले पाणी उद्योगांना देऊन उद्योगांचे पाणी शहरासाठी घेण्यात येणार आहे. यासाठी चाकण एमआयडीसी (Chakan MIDC) सोबत बोलणी झाली असून रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) सोबत बोलणी सुरू आहेत. यापुढे उद्योगांना धरणातील पाणी न देता पुनर्वापर केलेले पाणीच (Recycle water) देणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

 

Web Title :  Chandrakant Patil | water leak that would be enough for pune residents for four months

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा