Chandrakant Patil | ‘भाजप-शिवसेना एकत्र येण्याची आमची इच्छाच नाही’ – चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Chandrakant Patil | शिवसेना आणि भाजप (Shiv Sena and BJP) एकत्र येण्याची आमची इच्छाच नाहीये. आणि आम्हाला शिवसेनेबरोबर निवडणुकाही लढवायच्या नाहीत. असं स्पष्टच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे. चित्रपट अभिनेता विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी शिवसेना – भाजप एकत्र येण्यासाठी माझे प्रयत्न सुरु असल्याचे म्हणाले होते. यावरून चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

 

पुण्यामध्ये अभिनेता विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राम्हण महासंघाच्या वतीने त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळी बोलताना विक्रम गोखलेंनी शिवसेना-भाजप एकत्र येण्यासाठी माझे प्रयत्न सुरु असल्याचे म्हणाले होते.
या विधानावरुन चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘शिवसेना-भाजप एकत्र येण्याची आमची इच्छाच नाहीये. आणि आम्हाला शिवसेनेबरोबर निवडणुकाही लढवायच्या नाहीत.
बाळासाहेबांबद्दलच माझं प्रेम हे राजकीय प्रेम नाही. शिवसेना आणि भाजप एकत्र येण्यासाठी तर हे प्रेम बिलकुलच नाही. प्रेम हे त्यांच्या कर्तृत्वामुळे श्रद्धेपोटी आहे.
मी मुंबईत राहतो त्याठिकाणी चारही बाजूने मुस्लिम एरिया आहे. दंगे व्हायचे तेव्हा शिवसेना आम्हाला सुरक्षित ठिकाणी नारळवाडीत घेऊन जायची.
ती शिवसेना आणि या शिवसेनेत फरक असल्याचं पाटील म्हणाले.

गोखले म्हणालेत तर देवेंद्र आणि आपण मिळून टॅली करून घ्यायला हरकत नाही. त्यात आम्हाला आमची कोणतीही चूक वाटत नाही.
आमच्या 105 जागा यांच्या 56 मग मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे हे सगळ्यांना माहीत आहे.
आम्ही ताकदीने निवडणूक लढतो म्हणून एवढ्या जागा निवडून आणतो असेही ते यावेळी म्हणाले, दरम्यान, पुढे ते कंगना रानौतबाबत (Kangana Ranaut) बोलताना म्हणाले,
कंगना रानौतने हे म्हणायला हरकत नाही. की मोदीजी आल्यापासून आम्हाला स्वातंत्र्याचा अनुभव आला.
तिने 1947 च्या स्वातंत्र्यावर टीका टिपण्णी करण्याचं काहीच कारण नाही. असं ते म्हणाले.

 

Web Title : Chandrakant Patil | we do not want bjp shiv sena come together said chandrakant patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | वीज बचतीसाठी पुणे महापालिका नेमणार स्वतंत्र कंपनी; विद्युत विभागाने निविदा मागविल्या

Coronavirus | मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा बंगल्यात पुन्हा कोरोनाची ‘एन्ट्री’

Nawab Malik | नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर पुन्हा एकदा गंभीर आरोप; म्हणाले…