Chandrakant Patil | ‘महापूजा करायला कोणते मुख्यमंत्री येणार हे विठुमाउलींनाच ठाऊक’ – चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यातच शिंदे गट भाजपसोबत युती करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. यामुळे एक राजकीय तणाव निर्माण झाला आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टोलेबाजी केली आहे.

 

आषाढी वारीच्या स्वागतासाठी चंद्रकांत पाटील पुण्यात (Pune) होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “आषाढी एकादशीला पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुख्माईची महापूजा करायला कोणते मुख्यमंत्री येणार हे विठुमाउलींनाच ठाऊक, मी काही सांगू शकत नाही, मी निवांत बसलो आहे,” अशी राजकीय टोलेबाजी त्यांनी केली आहे.

 

मुख्यमंत्रीपद भाजपला मिळण्याचा गुलाल उधळणार का? असा सवाल करताच चंद्रकांत पाटील टोपी काढून केसांवरील गुलाल दाखवीत म्हणाले की, “आता हा गुलाल मी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील विजयासाठी शिल्लक ठेवला आहे.’ आषाढी एकादशीला महापूजेसाठी जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांसमवेत आपण असाल काय, हा सवाल देखील त्यांनी विनोदाने टोलवला आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | who will perform mahapuja in pandharpur chief minister uddhav thackeray – chandrakant patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा