Chandrakant Patil | ‘कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी मी मोदींना विनंती करणार’ – चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | केंद्र सरकारने (Central Government) आणलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी याबाबत घोषणा आज (शुक्रवारी) केली आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा हा कायदा सरकारने चांगल्या हेतूने आणला होता, मात्र, काही शेतकऱ्यांना पटवण्यात आम्ही अपयशी ठरलो असं मोदी म्हणाले. यावरुन देशभरातून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यानंतर आता भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘मी पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) विनंती करेल की शेतकऱ्यांना समजवून पुन्हा ते कायदे आणले पाहिजे’, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जो चांगला दर मिळण्याचा आनंद मिळणार होता ते कायदे पर्याय नसल्यामुळे मोदींना मागे घ्यावे लागत आहे. अनेक महिने आंदोलन चालू आहे. देशातील अनेक शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांना हे कायदे मान्य आहेत. पण एक विशिष्ट गट हा विषय घेऊन देशभर अडथळे निर्माण करत होता. कायद्यावर स्थगिती असताना तुम्ही आंदोलन का करत आहात असं सर्वाेच्च न्यायालयाने अनेक वेळा झाडले. इतरांना वेठीस धरुन स्वतःच्या मागण्या मान्य करुन घेऊ शकत नाहीत असं न्यायालयाने म्हटल्यावरही ऐकले गेले नाही. त्यामुळे मोदींनी ही घोषणी केली, असं ते म्हणाले.

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘मी स्वतः महाराष्ट्राचा कृषीमंत्री, पणनमंत्री होतो. यातल्या एक कायद्यामध्ये मार्केटच्या बरोबरीने मार्केटच्या बाहेर विकायची परवानगी देण्यात येणार होती. यात चुकीचे काय होते? या देशात काही चांगले असले की मोदींना विरोध. त्यांच्या निर्णयांना विरोध मग ते सर्वसामान्यांच्या हिताचे असले तरी चालतील. त्यामुळे एका छोट्या गटाला पटवून देण्यामध्ये आम्हाला अपयश आल्याचे मोदींने म्हटले. देशामधील अशांतता संपवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले. मी मोदींना विनंती करेल की शेतकऱ्यांना समजवून पुन्हा ते कायदे आणले पाहिजे,” असं पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे.

Web Title : Chandrakant Patil | will urge pm narendra modi to bring back agricultural laws bjp chandrakant patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Farm Laws | शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय ! वर्षभरापासून सुरू होतं आंदोलन; 600 शेतकर्‍यांचा बळी का घेतला?, विरोधकांचा पीएम मोदींवर हल्ला

Farm Laws | PM नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय ! 3 कृषी कायदे केंद्राकडून रद्द; देशवासियांची माफी मागून 7 वर्षाच्या काळात प्रथमच घेतले पाऊल मागे (व्हिडीओ)

Pune Crime | काय सांगता ! होय, चक्क पुणे महापालिकेला 1 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Balasaheb Thorat | ‘पोटनिवडणूक बिनविरोध करावी याबाबत फडणवीसांसोबत चर्चा’ – थोरात

Maharashtra Gram Panchayat by-election | महाराष्ट्रातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जारी

Kanyaka Bank Chandrapur Recruitment 2021 | श्री कन्यका नागरी सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या

NCP MLA Babajani Durrani | राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी; प्रचंड खळबळ