Chandrakant Patil | भाजपा किरीट सोमय्या यांच्या पाठीशी, त्यांचा आवाज दडपता येणार नाही; चंद्रकांत पाटील यांचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) बळाचा वापर करून भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आवाज दडपू पाहत आहे पण ही दडपशाही चालणार नाही. भाजपा पूर्णपणे किरीट सोमय्या यांच्या पाठीशी असून त्यांचा आवाज दडपता येणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी रविवारी दिला. पुण्यात गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले की, भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या भ्रष्टाचारी (Corruption) मंत्र्यांची प्रकरणे बाहेर काढत असताना त्यांना कोल्हापूरला जाण्यास रोखण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केला. महाविकास आघाडी सरकारने त्यांना रोखण्यासाठी पोलीस पथक पाठवले, त्यांच्यावर दबाव आणला. कोल्हापूरमध्ये प्रवेश करू देणार नाही, रेल्वे स्थानकावरून परत पाठवू, कोल्हापूरच्या सर्किट हाऊसमध्ये (Circuit House, Kolhapur) स्थानबद्ध करू असे इशारे किरीट सोमय्या यांना या सरकारने दिले.

राज्यातील लोकशाही संपली का असा सवाल करून चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारची दंडुकेशाही चालणार नाही. या सरकारच्या दडपशाहीला भाजपा घाबरत नाही आणि किरीट सोमय्या हे सुद्धा घाबरत नाहीत. भाजपा किरीट सोमय्या यांच्या पाठीशी असून त्यांनी उघडकीस आणलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे शेवटाकडे नेली जातील. महाविकास आघाडीने दडपल्याने हे विषय थांबणार नाहीत.

मुंबईत घातपाती कारवाया करण्याच्या प्रयत्नातील दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) पकडले जाते. महाविकास आघाडीच्या राज्यात दहशतवादी मोकळेपणाने फिरतात आणि किरीट सोमय्या यांच्या घराबाहेर मात्र दीडशे पोलिसांचा वेढा घातला जातो, याचा आपण निषेध करतो.

Web Titel :- Chandrakant Patil | With the backing of BJP Kirit Somaiya, his voice cannot be suppressed; Chandrakant Patil’s warning

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Charanjit Singh Channi | चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवीन मुख्यमंत्री, पहिल्यांदा राज्यात दलित नेत्याला संधी

Pune Police | पुणेकरांनो मनःपूर्वक आभार ! गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

Indian Railway | बेरोजगार सुवर्णसंधी ! रेल्वेने सुरू केली विशेष योजना, 50 हजार तरूणांना मिळेल प्रशिक्षण; ‘या’ 4 ट्रेडमध्ये मिळवू शकतात नोकरी