Chandrakant Patil’s Appeal To Sharad Pawar | टुकडे टुकडे गँग… ! चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना आवाहन, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil’s Appeal To Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी हिंदू विवाहातील वादग्रस्त वक्तव्यामुळे असंतोष निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी थेट राष्ट्रवादीच्या अध्यक्षांवर (NCP Chief Sharad Pawar) निशाणा साधला आहे.

 

हिंदू समाजातील पुराोहितांची टिंगल करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची इतर धर्मियांच्या धर्मगुरूंची (Pastor) टिंगल करण्याची हिंमत होत नाही. हे आश्चर्यकारक आहे. शरद पवार हे नास्तिक आहेत की आस्तिक हे माहित नाही पण त्यांच्या पक्षाचे नेते आर्वजुन हिंदू पुरोहितांची टिंगल करतात मात्र सर्वांना दिसलं. राष्ट्रवादी काँग्रेसची टुकडे टुकडे गँग पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी आवरावी, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. (Chandrakant Patil’s Appeal To Sharad Pawar)

 

स्वत: ला पुरोगामी म्हणवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला एखाद्या समाज घटकाला असं लक्ष्य करणं शोभत नाही. मात्र यांचा पुरोगामीपणा हा फक्त सांगण्यापुरता आहे. या पक्षातील नेत्यांना विविध समाजघटकांमध्ये भांडणं लावून समाजाचे तुकडे करण्यात रस असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणावरूनही (Maratha Reservation) पाटलांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

 

दरम्यान, महाराष्ट्रात 1999 ते 2014 अशी पंधरा वर्षे सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही.
त्यानंतर 2019 साली मतदारांचा विश्वासघात करून सत्ता मिळवल्यानंतर त्यांनी मराठा समाजाचे असलेलं आरक्षण घालवल्याची टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil’s Appeal To Sharad Pawar | bjp leader chandrakant patil appeal to ncp chief sharad pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा