Chandrakant Patil’s Direct Meeting And Interaction With Punekars | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा नागरिकांशी थेट भेट व संवाद ! महात्मा सोसायटीत मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil’s Direct Meeting And Interaction With Punekars | पालकमंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आजपासून नागरिकांशी थेट भेट व संवाद उपक्रम सुरू केला असून, आज महात्मा सोसायटी (Mahatma Society Pune) परिसरात मॉर्निंग वॉकसाठी (Morning Walk) येणाऱ्या नागरिकांशी नामदार पाटील यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. (Chandrakant Patil’s Direct Meeting And Interaction With Punekars)

 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोथरुड (Kothrud) मधून आमदार म्हणून ‌निवडून आल्यापासून सतत वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधत असतात. आजपासून त्यांनी थेट भेट व‌ संवाद उपक्रम सुरू केला असून, सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. आज महात्मा सोसायटी परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून, समस्या जाणून घेतल्या.

 

यात प्रामुख्याने पाण्याच्या प्रश्नासह महात्मा सोसायटीत बसविण्यात आलेल्या स्पीड ब्रेकर संदर्भात अनेकांनी तक्रारी मांडल्या. यंदा पर्जन्यमान कमी असल्याने महापालिका आणि जलसंपदा विभाग पाण्याचे नियोजन करत आहे. सध्या महापालिकेला शहरात कुठेही पाणीकपात करु नये, अशा सूचना दिल्या आहेत. पण तरी नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले.

तसेच महात्मा सोसायटीतून जाणारा रस्ता हा खासगी असूनही, पुणे-बेंगलोर महामार्गाकडे (Pune Bengaluru Highway) जाण्यासाठी अनेकजण याच मार्गाचा वापर करतात. परिणामी सदर रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. या रस्त्याला पर्यायी असणारा एकलव्य कॉलेजजवळून (Eklavya College Kothrud) जाणारा मार्ग तयार करण्याचे प्रस्तावित असून, लवकरच तो तयार होईल, त्यासाठी माझ्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देऊ. त्यानंतर सदर मार्गावरील वाहतूक कमी होईल, आणि त्यामुळे वाहतुकीचाही प्रश्न सुटेल, असा विश्वास व्यक्त केला.

 

Web Title :  Chandrakant Patil’s Direct Meeting And Interaction With Punekars | Guardian Minister
Chandrakant Patil’s direct meeting and interaction with citizens! Interaction with
citizens coming for morning walk in Mahatma Society

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा