कोथरूडकरांसाठी चंद्रकांत पाटलांचा ‘ई गव्हर्नन्स’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोथरूड विधानसभेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडकरांना घरबसल्या आपल्याशी, कार्यालयाशी संवाद साधण्यासाठी ‘ई ऑफिस चंद्रकांत पाटील’ या मोबाईल अ‍ॅपची निर्मिती केली आहे. गुगल प्ले स्टोर वरून हे अप्लिकेशन डाऊनलोड करून पाटील यांच्या संपर्कात राहाता येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी कामकाजाची माहिती मिळण्यासाठी, सामान्य नागरिकांना आपल्याशी संपर्कात राहण्यासाठी सरकारी कामात पारदर्शकता आणण्यासाठी अशा प्रकारच्या ‘ई गव्हर्नन्स’चा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ‘आपले सरकार’च्या माध्यमातून राज्यातील कोट्यवधी सामान्य नागरिकांना याच माध्यमातून पारदर्शक कारभाराची अनुभूती दिली आहे. कोथरूड विधानसभेतील बहुतांश मतदार या माध्यमांचा वापर करत असल्यामुळे नागरिकांना या मोबाईल अपचा आपल्या दैनंदिन कामकाजासाठी, समस्यांसाठी, पाटील यांना निवेदन, निमंत्रण, सूचना पाठविण्यासाठी उपयोग होऊ शकणार आहे.

‘या’ अप्लिकेशन मध्ये माझ्या विषयी, संवाद- ब्लॉग, कोथरूड संकल्प, निवेदन-समस्या-निमंत्रण, कार्य अहवाल, संपर्क, वृत्तपत्र लेखणीतून, छायाचित्रे- व्हिडीओ, नेहमी विचारले जाणारे प्रश्न इत्यादी माहितीचा समावेश आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी/ मतदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या