मंत्री जयंत पाटलांचा टोला; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांना स्वप्न बघण्याचा छंद’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कालच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी निशाणा साधत सर्वजण असतानाच हे सरकार जाईल असे वक्तव्य केले होते. यावरून मंत्री नवाब मलिक यांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिले होते. चंद्रकांत पाटील (chandrakant patil)  यांच्या या वक्तव्यावरून आता जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी त्यांचा समाचार घेत. चंद्रकांत पाटलांना स्वप्न पडण्याचा छंद असेल तर त्याला मी काहीच करून शकत नाही अशा शब्दात टोला लगावला आहे.

जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे. मात्र अशी वक्तव्य पाटील हे नेहमीच करत असतात. सर्वजण झोपेत असताना सरकार पडेल अशी भविष्यवाणीही त्यांनी केली होती. यावर त्यांना स्वप्न पडण्याचा छंद असेल, तर त्यावर काय बोलणार असे जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. यावेळी जयंत पाटील हे पुण्यात साखर कारखान्याच्या बैठकीदरम्यानच्या माध्यमाशी बोलत होते.

या दरम्यान, जयंत पाटील पुढे म्हणाले, केंद्रात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती पाहून अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही, याचं कारण जगजाहीर आहे. राज्य सरकारने अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी असे चंद्रकांत पाटील म्हणतात. केंद्राचा नियम हा प्रत्येक राज्यालाही लागू होतो. त्यामुळे महाराष्ट्रतही अधिवेशन होणार नसल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

 

Also Read This : 

 

‘PM मोदींच्या कार्याला नौटंकी म्हणणे म्हणजे देशाचा अन् जनतेचा अपमान’ – केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

 

तुम्हाला देखील असतील ‘या’ 3 समस्या तर आजपासूनच खाण्यास सुरूवात करा गाजर, जाणून घ्या

 

खुशखबर ! शेतकर्‍यांना मिळणार 4000 रुपये; 30 जूनच्या पूर्वी येथे करावा लागेल अर्ज, जाणून घ्या पूर्ण डिटेल

 

डोळयात आग होतेय, जळजळ करतंय तर मग ‘हे’ घरगुती उपाय करा, जाणून घ्या

 

DRDO चे कोरोनावरील औषध 2DG ची किंमत ठरली, 990 रुपयात मिळेल पाऊच

 

 

न्यूट्रिशनची पावर हाऊस आहे ‘ही’ एक ‘गंमत’, उन्हाळ्यात खाल्ल्याने आरोग्याला होतील 8 फायदे, जाणून घ्या