चंद्रकांत पाटलांचा ‘यू टूर्न’ 

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन 

यापुढे कोणतीच निवडणूक लढणार नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी काल  कोल्हापुरात जाहीर केले होते. तसेच  पाटील यांनी यावेळी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून महेश जाधव हे भाजपचे उमेदवार असतील, अशी घोषणाही केली होती.  त्यांच्या या घोषणेने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र आज लगेच त्यांनी आपल्या भूमिकेपासून फारकत घेतली आहे.  मी कोणत्याही प्रकारचा  राजकीय संन्यास घेणार नाही. मी निवडणुका लढवणार नाही हे वेगळ्या संदर्भाने म्हणालो, असं स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

[amazon_link asins=’B07335K95J,B01MTX7IXG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’58afc8c5-b26b-11e8-a41c-af464e4642df’]

चंद्रकांत पाटील म्हणाले की ,”मला कुठली  निवडणूक लढवायची नाही. मला एखादी सामाजिक भूमिका घेताना त्यात सामाजिक स्वास्थ्य असेल तर मला मतदान नाही झालं किंवा निवडणुकीत अडचण येत असेल तरी चालेल अशी माझी कायम भूमिका आहे.आमच्याकडे राजकीय संन्यास घेणं आमच्या हातात नसतं, ते पार्टी ठरवते. अजून तरी पार्टीने कुठलीही निवडणूक लढू नका असे सांगितलेलं नाही.सध्या निवडणुका नाहीत, त्यामुळे ना मी लोकसभा लढवतोय, ना विधानसभा, ना पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवणार . त्यामुळे मी पुढच्या निवडणुकाच लढवणार नाही असा त्याचा अर्थ होत नाही. माझं कालचं विधान कालच्या घटनेपुरतं मर्यादित होतं. मी निवडणूक लढवावी की नाही हा निर्णय पक्ष घेईल. ”

दाऊदला पकडण्यासाठी आता अमेरिका करणार मदत

सार्वजनिक बांधकाम मंत्री, महसूल मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री अशी तीन महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी २००४  साली भाजपमध्ये प्रवेश करत सक्रीय राजकारणात प्रवेश केला.पुढे २०१३साली चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष झाले.२०१४  मध्ये ते विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१४  साली राज्यात सत्ता आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले.