तेलंगणा : निवडणूक लढवणारी पहिली ट्रान्सजेंडर उमेदवार चंद्रमुखी गायब 

तेलंगणा : वृत्तसंस्था – तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मुदतीपूर्वीच विधानसभा बरखास्त केल्यामुळे येथे सहा महिने आधीच निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार ७ डिसेंबर रोजी ११९ जागांसाठी येथे निवडणूक होणार आहे. पण तेलंगणात निवडणूक लढवणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला उमेदवार चंद्रमुखी या बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. या बातमीमुळे खळबळ निर्माण झाली आहे. हैदराबादमधील मतदारसंघातून बहुजन डावी आघाडीकडून त्या विधानसभा निवडणूक लढवत आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

राहत्या घरातून बेपत्ता

याबाबत मिळालेलीच अधिक माहिती शी की, चंद्रमुखी या हैदराबादमधील गोशामहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. कालपासून (मंगळवार) त्या येथील आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकेश गौड यांच्याविरोधात त्या निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर भाजपाचे टी. राजा आणि टीआरएसचे प्रेमसिंह राठोड हे देखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.