Chandrapur ACB Trap | 5 हजार रुपये लाच घेताना महिला वनरक्षकासह पतीला अँन्टी करप्शनकडून अटक

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – अतिक्रमित वनजमिनीवर रोपवन न करण्याच्या कामासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या (Accepting Bribe) महिला वनरक्षकासह (Woman Forest Guard) तिच्या पतीला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Chandrapur ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. सावली तालुक्यातील उपरी बिटातील वनरक्षक शारदा कुळमेथे (Sarada Kulmethe) व तिचे पती संजय अंताराम आतला (Husband Sanjay Antaram Aatla) अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. चंद्रपूर एसीबीच्या पथकाने (Chandrapur ACB Trap)  ही कारवाई सोमवारी (दि.17) सायंकाळी केली.

 

याबाबत तक्रारदार यांनी चंद्रपूर एसीबीकडे (Chandrapur ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या वडिलांनी वनजमिनीवर (Forest Land) अतिक्रमण केले होते. या वनजमिनीवर वनविभागाकडून रोपवन न करण्याच्या कामासाठी उपरी बिटातील वनरक्षक शारदा कुळमेथे यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी (Demanding a Bribe) केली. तडजोडी अंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली.

 

एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता वनरक्षक शारदा कुळमेथे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
तसेच लाचेची रक्कम पतीकडे देण्यास सांगितले. तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाच घेताना वनरक्षक कुळमेथे
यांच्या पतीला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर वनरक्षक शारदा कुळमेथे यांना ताब्यात घेण्यात आले.

 

ही कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे (DySP Avinash Bhamre),
पोलिस निरीक्षक शिल्पा भरडे (PI Shilpa Bharde) यांच्यासह नरेश नन्नावरे, रवी ढेंगळे, वैभव गाडगे,
पुष्पा काथोडे, सतीश सिडाम यांच्यासह चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे.

 

 

Web Title :- Chandrapur ACB Trap | Anti-corruption arrested woman forest guard along with her husband while taking bribe of Rs.5 thousand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political News | अजितदादा भाजपसोबत जाणार? राष्ट्रवादीचे आमदार म्हणाले – ‘परिस्थितीनुसार निर्णय…’

Bombay High Court | मुंबई हायकोर्टाचा ठाकरे गटाला दणका तर शिंदे सरकारला दिलासा; BMC मध्ये 227 वॉर्ड राहणार

Black-Yellow Taxis Fares Hike In Pune | पुणे जिल्ह्यातील काळ्या- पिवळ्या टॅक्सीच्या भाडेदरात वाढ, जाणून घ्या सविस्तर