Chandrapur Accident | चंद्रपूरमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसचा भीषण अपघात; 2 ठार, 17 जखमी

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – चंद्रपूरमध्ये प्रवासी वाहतूक करणारी खाजगी बस उलटून भीषण अपघात (Chandrapur Accident) झाला आहे. विरुर- धानोरा महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. हि बस प्रवाशांना घेऊन हैदराबादकडे निघाली होती. या भीषण अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री हा भीषण अपघात (Chandrapur Accident) झाला आहे. या अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी विरुर, राजुरा, चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी झालेल्यांपैकी काही लोकांची प्रकृती नाजूक असल्याचे समजत आहे.

कसा घडला अपघात?
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात येणाऱ्या विरूर- धानोरा मार्गावरून हि अपघातग्रस्त खाजगी बस प्रवाशांना घेऊन हैदराबादच्या दिशेने निघाली होती. मात्र काही अंतर गेल्यावर बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ह्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. (Chandrapur Accident)

या अपघाताची माहिती मिळताच विरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. काही जखमींना राजुरा तर काहींना चंद्रपुरातील रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच ज्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे अशा प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विरूर पोलिस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

Web Title :-Chandrapur Accident | private bus accident on virur dhanora road 2 passengers killed on the spot 17 injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

U19 Womens World Cup | सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Advay Hire | शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करताच अद्वय हिरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले…

CM Eknath Shinde | आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४ ते ६ जागा राखता आल्या तरी पुरेसं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे