चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Chandrapur Crime News | पोलीस असलेल्या वर्गमित्रानेच हत्या करून मृतदेह शौचालयाच्या टाकीत लपवल्याची घटना समोर आली आहे. चिमूर येथील मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह (दि.१०) सापडला आहे. अरुणा काकडे (वय-३७) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह हरिश्चंद्रवेळा येथील निर्जनस्थळी असलेल्या एका घरातील शौचालयाच्या टाकीमध्ये लवपला होता. दरम्यान या महिलेच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी नरेश डाहूले या चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतील निलंबित पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. पोलिसांनी कॉल रेकॉर्डच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला.
चिमूर येथील देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका अरुणा काकडे मिसिंग असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. नागपूर आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आरोपीचा छडा लावला. मृत अरुणा काकडे आणि आरोपी नरेश डाहूले लहानपणापासून एकाच शाळेत शिकले होते. दोघे वर्गमित्र होते.
२६ तारखेला मृतक अरुणा आणि आरोपी नरेश नागपूरला एकत्र होते. दरम्यान, या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु झाला होता. दोघे नागपूरला गेले असताना दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि आरोपीने अरुणा यांचा गळा दाबून हत्या केली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
https://www.instagram.com/policenamaa/?hl=en#