Chandrapur Crime News | माजी केंद्रीय मंत्र्याच्या पुतण्यासह आणखी एकाचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; चंद्रपूरमधील घटना

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – चंद्रपूरमध्ये (Chandrapur Crime News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर (Union Minister of State for Home Hansraj Ahir) यांच्या पुतण्याचा आणि आणखी एका व्यक्तीचा मृतदेह चंदीगढ येथील जंगलात झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेमुळे (Chandrapur Crime News) परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. महेश अहिर (Mahesh Ahir), हरीश धोटे (Harish Dhote) अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. महेश अहिर आणि हरीश धोटे यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. चंदीगड पोलीस (Chandigarh Police) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?
मृत महेश हरिश्चंद्र अहिर आणि त्याचा मित्र हरीश धोटे हे काही दिवसांपूर्वी घरून बेपत्ता झाले होते.
यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान चंदीगढ येथील सेक्टर 43 मधील
बसस्थानक (आयएसबीटी-43) समोरील सेक्टर 52 अंतर्गत येणाऱ्या कजेहडी गावाशेजारील जंगलात दोघांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची नोंद सेक्टर 36 पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

यानंतर चंदीगड पोलिसांनी हे दोघे तरुण ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या ठिकाणी चौकशी केली असता ते
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले. यानंतर चंदीगड पोलिसांनी बुधवारी चंद्रपूर पोलिसांशी
संपर्क साधला. यानंतर आढळून आलेले मृतदेह हे महेश अहिर आणि हरीश धोटे यांचे असल्याचे उघडकीस आले.
या तरुणांनी आत्म्हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवून चंदीगढ पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Web Title :- Chandrapur Crime News | the body of two youths including the nephew of a former union minister was found

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

FIR On NCP Sachin Dodke | राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंविरूध्द गुन्हा दाखल; भाजप सरचिटणीसाला धमकावून कामगारांना केली मारहाण

Pune Crime News | पुण्यात दोन कारवायात 11 लाखांचे अमली पदार्थ जप्त; कॅथा इडुलिस खत, ड्रग्ज प्रथमच पकडले, दोन परदेशी नागरिकांना अटक

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर, अखेर ‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवले

Pune Crime News | रूम भाड्याने देताय सावधान; डिपॉझिट पाठविण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक