Chandrapur Crime News | खळबळजनक ! पहाटेच्या सुमारास मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना आढळले दोघांचे मृतदेह

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. लोक एका शुल्लक कारणासाठी एकमेकांच्या जीवावर उठत आहेत. अशीच एक हादरवून टाकणारी घटना महाराष्ट्रातील चंद्रपूर (Chandrapur Crime News) जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur Crime News) भद्रावती तालुक्यातील मांगली गावात जगन्नाथ महाराज मठामध्ये दोन जणांचा मृतदेह आढळून आला आहे. पहाटेच्या सुमारास हि घटना उघडकीस आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मधुकर खुजे (Madhukar Khoje), बाबुराव खारकर (Baburao Kharkar) अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. ते मांगली गावातील रहिवाशी आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ह्यांचे मृतदेह आढळून आले त्या ठिकणापासून काही अंतरावर मठात असलेली दानपेटी फोडलेल्या अवस्थेत आढळून आली. दानपेटी फोडायला आलेल्या चोरांनी या दोघांची हत्या (Murder) केली असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. भद्रावती तालुक्यातील मांगली येथील मधुकर खुजे, बाबुराव खारकर यांची शेती गावातील जगन्नाथ महाराज मठाशेजारी (Jagannath Maharaj Math) आहे. ते रोज शेतात जागलीसाठी जातात. शेताच्या शेजारी मंदिर लागून असल्याने ते या ठिकाणी विसावा घेत असत. (Chandrapur Crime News)

बुधवारी पहाटेच्या सुमारास या मठामध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना त्यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात
आढळून आले. हि घटना उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी मंदिराकडे धाव घेतली.
यावेळी मंदिरातील दानपेटी मंदिरापासून काही अंतरावर फोडलेल्या स्थितीत आढळून आली.
यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून पुढील तपासाला सुरूवात केली आहे.

Web Title :-  Chandrapur Crime News | two murders in chandrapur bloody bodies found in temple

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

FIR On NCP Sachin Dodke | राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंविरूध्द गुन्हा दाखल; भाजप सरचिटणीसाला धमकावून कामगारांना केली मारहाण

Pune Crime News | पुण्यात दोन कारवायात 11 लाखांचे अमली पदार्थ जप्त; कॅथा इडुलिस खत, ड्रग्ज प्रथमच पकडले, दोन परदेशी नागरिकांना अटक

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर, अखेर ‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवले

Pune Crime News | रूम भाड्याने देताय सावधान; डिपॉझिट पाठविण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक