धक्कादायक ! पतीचा कुऱ्हाडीने सपासप वार करून खून ; पत्नीची नदीत उडीमारून आत्महत्या

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पती वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याने वैतागलेल्या पत्नीने पतीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून निघृण खून केला. पतीचा खून केल्यानंतर पत्नीने नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चंद्रपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या नकोडा गावात घडली आहे.

बबलू सोयाम असे खून झालेल्या पतीचे नाव आहे तर अर्चना सोयाम असे नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी घुग्गुस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बबलू सोयाम हा अर्चनाच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. यातूनच दोघांमध्ये वाद होत होते. बबलूच्या या स्वभावाला कंटाळून अर्चनाने हे कृत्य केले. बबलू सोयाम बुधवारी रात्री घरामध्ये झोपला होता. रात्री तीनच्या सुमारास अर्चनाने बबलूवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बबलूचा जागीच मृत्यू झाला. पतीचा खून केल्यानंतर पत्नीने गावाजवळ असलेल्या वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच घुग्गुस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like