चंद्रपूर जिल्हा बँकेतर्फे कॅन्सरग्रस्ताला आर्थिक मदत

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा ब्रह्मपुरीतर्फे शेतकरी कल्याण निधीअंतर्गत तालुक्यातील निलज (रुई) येथील मुखरु सदाराम राहाटे यांच्या मुलाच्या कॅन्सरच्या उपचाराकरिता बँकेकडून ६० हजाराची आर्थिक मदत देण्यात आली.

शेतकऱ्यांच्या हक्काची बँक म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ओळखली जाते. बँकेच्या वतीने शेतकरी कल्याण निधीअंतर्गत नेहमीच शेतकरी, शेतमजूर यांना बिकट परिस्थितीत नेहमीच मदत केली जाते. तालुक्यातील निलज (रुई) येथील मुखरु राहाटे यांच्या मुलाला कॅन्सर या असाध्य रोगाने ग्रासले.

मात्र, घरातील आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने रुग्णावर योग्य उपचार होत नव्हता. ही बाब कळताच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ज्येष्ठ संचालक दामोधर मिसार यांच्या पुढाकाराने रुग्णाला ६० हजाराची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी बँकेचे संचालक दामोधर मिसार, संचालिका सुचित्रा ठाकरे, विभागीय अधिकारी गोपीनाथ भोयर, अण्णाजी ठाकरे, शाखा व्यवस्थापक उदय पांडे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Loading...
You might also like