१५ हजाराची लाच घेताना कारागृह आधिक्षक Anti corruption च्या जाळ्यात

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन
चंद्रपूर जिल्हा कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांना एसीबी च्या पथकाने १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाच घेताना अटक झाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील गृह न्याय विभागात मोठी  खळबळ उडाली आहे. ही कारवाई रात्री कारागृह परिसरात असलेल्या ढोले यांच्या निवासस्थानी करण्यात आली. मुदतीपूर्वी सुटका झालेल्या एका आरोपीचा पत्ता देण्यासाठी त्यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8c68276d-cde9-11e8-ad77-79cf9e3b4874′]

याबाबत ,मिळालेली अधिक माहिती अशी की, चंद्रपूर जिल्हा कारागृहात एक आरोपी काही दिवसांपासून जेरबंद होता. काही कारणाने या आरोपीची मुदतपूर्व सुटका झाली. सुटका झालेल्या आरोपीच्या शोधार्थ तक्रारकर्ते कारागृहात पोहचले. बँकेचे समन्स बजावण्यासाठी तक्रारदाराला हा पत्ता आवश्यक होता. यासाठी 25 हजार रुपयांची मागणी कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी केली. मात्र 15 हजार रुपयात सौदा पक्का झाला.
कारागृह परिसरात असलेल्या ढोले यांच्या निवासस्थानी तक्रारदार आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक पंचासह पोहचले. 15 हजार रुपयांची लाच घेताना ढोले यांना शासकीय निवासस्थानातून एसीबीने रंगेहाथ अटक केली. रात्रीच्या सुमारास झालेल्या या कारवाईने चंद्रपूर जिल्ह्यातील गृह-न्याय विभागात खळबळ उडाली आहे.

आॅनलाईन गेम्सच्या नादापायी मुलाने केली कुटुंबाची हत्या

भाईदास ढोले यांच्या कारागृह कार्यालय, निवास आणि मूळ गावी देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शोधमोहीम राबवली असून एसीबीची कारवाई वेगवान सुरु झाली आहे.

[amazon_link asins=’B00LHZWD0C,B00J4YG0PC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ab99d714-cde9-11e8-92f8-d10afdb645c2′]