Chandrapur Fire News | चंद्रपूरमध्ये कापडाच्या दुकानाला भीषण आग

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Chandrapur Fire News | चंद्रपूरमध्ये आगीची घटना समोर आली आहे. मूल पोलिस ठाण्याला लागून असलेल्या कापड दुकानाला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुकानातील इनव्हर्टरमुळे हि आग (Chandrapur Fire News) लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
चंद्रपूरमधील मूल या ठिकाणी दत्तात्रय गोगीरवार यांचे सोमनाथ रोडवर पोलिस स्टेशन जवळ कापड दुकान आहे. आज पहाटे अचानक या दुकानाला आग लागली. गस्तीवर असलेल्या पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस, नगरपालिकेचे कर्मचारी आणि माजी नगरसेवक प्रशांत समर्थ यांनी घटनास्थळी धाव घेऊन हि आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. यासाठी मूल आणि सावली येथील अग्‍निशमन विभागाच्या वाहनांना पाचारण करण्यात आले. त्यांनी आगीवर नियंत्रण आणले मात्र तोपर्यंत आगीमध्ये दुकानातील विविध प्रकारच्या कापडाचे पूर्णत: नुकसान झाले होते. काउंटर वरील लॅपटॉप आणि हिशोबाचे दस्ताऐवज, छतावरील पीयुपी, इलेक्टिक वायरिंग जळून खाक झाली होती. या भीषण आगीमध्ये दत्तात्रय गोगीरवार यांचे पन्नास ते साठ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळजवळ दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. (Chandrapur Fire News)

काही दिवसांपूर्वी रायगड जिल्हा बँकेलादेखील अशीच आग लागली होती
काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्याच्या कर्जत शहरातील रायगड जिल्हा बँकेला भीषण आग लागल्याची घटना घडली होती.
कर्जत शहरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकातील श्री कपालेश्वर मंदिराच्या पहिल्या मजल्यावर ही बँक आहे.
पहाटेच्या सुमारास हि आग लागली होती. या आगीमध्ये बँकेतील सर्व कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.
हि आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Web Title :- Chandrapur Fire News | a terrible fire out at shop in chandrapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Osmanabad News | उस्मानाबादमध्ये उरुसासाठी जमलेल्या गर्दीत वळू उधळून 14 भाविक जखमी

Parbhani Crime News | धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहित महिलेचा केला गर्भपात

Pune Crime News | कोल्ड्रींगमधून गुंगीचे औषध टाकून महिलेवर केला बलात्कार; जबरदस्तीने लग्न करायला लावून मारहाण करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल