‘या’ जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याची ठाकरे सरकारकडून ‘तयारी’ ?

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – अवैध दारुविक्री आणि महसूल नुकसानामुळे महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी हटवण्याच्या तयारीत आहे. दारुबंदीमुळे कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाला असल्याने आघाडी सरकारने हा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विषयी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाच वर्षापूर्वी भाजप सरकारने दारुबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. तर भाजप सरकार सत्तेमध्ये असेपर्यंत हा निर्णय कायम राहिला. मात्र, भाजप सत्तेतून गेल्यानंतर आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर याआधीच्या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना ब्रेक लावण्यात आला. भाजप सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा घेतलेला निर्णय आता ठाकरे सरकार हटवण्याच्या तयारीत आहे.

दारुबंदीमुळे मागील पाच वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात 200 कोटी रुपयांचा महसूल बुडाला. बेकायदा विक्रीमुळे महसूल बुडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महसूलवाढीसाठी ठाकरे सरकार दारूबंदी हटवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/