Chandrapur Murder Case | तीन महिन्याने बाहेर आला खुनाचा कट, मुलीने कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यामुळे आई अटकेत

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Chandrapur Murder Case | स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तीन महिन्याने आईला भेटायला आलेल्या मुलीला वडिलांच्या मृत्यूबद्दल वेगळीच माहिती (Chandrapur Murder Case) अनपेक्षित रित्या कळली. रंजना रामटेके या महिलेचे पती तीन महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने वारले होते. त्यानंतर त्यांची मुलगी त्यांना भेटायला आली होती. पण आईच्या मोबाईलमधील (Mobile) कॉल रेकॉर्डिंग (Call Recording) ऐकून मुलीला मोठा धक्का बसला आणि तिने थेट पोलीस स्टेशनची वाट धरली.

रंजना रामटेके या महिलेने निवृत्त सरकारी अधिकारी असणाऱ्या आपल्या पतीची ६ ऑगस्टला उशीच्या साहाय्याने खून (Chandrapur Murder Case) केला होता. खून केल्यानंतर तिने आपल्या प्रियकराला फोन करुन खुनाची (Chandrapur Murder) माहिती दिली होती. पण, हा संपूर्ण संवाद मोबाइलमध्ये रेकॉर्ड झाला होता, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. तो संपूर्ण संवाद तिच्या मुलीने ऐकला आणि पोलिस स्टेशनमध्ये येऊन स्वतःच्या आई विरोधात गुन्हा दाखल केला.

“मी उशीच्या सहाय्याने त्यांचा खून केला आहे.
मी आता सकाळी नातेवाईकांना फोन करुन मृत्यू झाल्याची माहिती देईल.
ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगणार आहे,”
अशी माहिती देतानाची रेकॉर्डिंग महिलेच्या मोबाईल मध्ये झाली होती.
दुसऱ्या दिवशी महिलेने ठरल्याप्रमाणे नातेवाईकांना फोन करुन खोटी बतावणी केली.
कोणालाही संशय न आल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले आहे.

आता गुन्हा बाहेर आल्यानंतर रंजना रामटेके आणि तिचा प्रियकर मुकेश त्रिवेदी यांना ताब्यात घेतले आहे.
त्यांनी त्यांचा गुन्हा काबुल केला आहे.

Web Title :- Chandrapur Murder Case | police arrested woman in murder case of husband after daughter finds audio clip in mobile

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | हातचालाखीने ATM काढून घेत वृद्धाची 85 हजारांची फसवणूक, तळेगाव दाभाडे मधील प्रकार

Ashish Shelar | राहुल गांधींचे विधान म्हणजे बेअक्कलपणा – आशिष शेलार