Chandrapur Crime News | जनरेटरच्या धुरामुळे गुदमरुन 6 जणांचा मृत्यु

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrapur News |वीज गेल्यानंतर जनरेटरचा वापर करणे नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. चंद्रपूरातील (Chandrapur) दुर्गापूर भागात जनरेटरच्या (Generator) धुरात गुदमरुन एकाच घरातील ६ जणांचा मृत्यु (Death)  झाला आहे. केवळ एकाचा जीव वाचला आहे. चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर भागातील वॉर्ड क्रमांक ३ मधील धक्कादायक व दुदैवी घटना आज सकाळी सात वाजता उजेडात आली.

रमेश लष्करे (वय ४४), अजय लष्करे (वय २०), लखन लष्करे (वय ९), कृष्णा लष्करे (वय ८), माधुरी लष्करे (वय १८), पूजा लष्करे (वय १४) अशी मृतांची नावे आहेत. दासू लष्करे (वय ४०) हे एकमेव बचावले आहेत.
वीज गेल्यानंतर रात्री त्यांनी घरात डिझेल जनरेटर सुरु केला होता. घरातील सर्व खिडक्या, दरवाजे बंद होते. त्यामुळे जनरेटरचा धुर घरात कोंडला गेला आणि या कुटुंबाचा झोपेतच मृत्यु झाला.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे कुटुंब नेहमी पहाटे साडेपाच वाजता उठते. पण आज सकाळचे सात वाजले तरी त्यांच्या घरात हालचाल न दिसल्याने शेजारी राहणार्‍यांनी दरवाजा वाजविला. तरी तो उघडण्यात न असल्याने संशय आल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
तेव्हा त्यांना आतील सर्व जण निपचित पडून असल्याचे दिसले.
त्यांना जवळच्या खासगी रुग्णालया (Private hospital) त नेले असता त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दुर्गापूर गावातील 11 केव्हीचे ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड आल्याने वीज पुरवठा (Power supply)खंडित झाला होता. रात्रभर वीज पुरवठा बंदच होता.
लष्कर कुटुंबाने आपल्या घरातील जनरेटर सुरू करून ठेवले.
त्यातून विषारी वायू गळती झाल्याने कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : Chandrapur News | 6 people died due to generator smoke in chandrapur

 

हे देखील वाचा

Lightning | वीज कोसळल्याने देशात 78 लोकांचा गेला बळी;
पीएम मोदींनी केली आर्थिक मदतीची घोषणा

Smartphone | जर तुमची मुले सुद्धा जास्त मोबाइल पहात असतील तर
‘या’ 6 टिप्सचा करा वापर, जाणून घ्या

Thane Crime News | धक्कादायक ! चक्क रक्ताचा टिळा लावून केला प्रेमाचा बनाव,
विवाहित तरूणाचे युवतीवर लैंगिक अत्याचार