Chandrapur Crime | अधिकाऱ्यांच्या बोगस सहीने नोकरीचे नियुक्तीपत्र, 22 बेरोजगारांची 1 कोटींची फसवणूक

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – चंद्रपूर जिल्हा परिषदेत (Chandrapur Zilla Parishad) नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून चक्क तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने (Fake signature) अनेक बेरोजगार तरुणांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार चंद्रपूरमध्ये (Chandrapur Crime) उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur Crime) एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी 22 तरुणांची फसवणूक (Cheating) केली असून रामनगर पोलीस ठाण्यात (Ramnagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या घटनेत एक कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे बेरोजगार तरुणांनी सांगितले.

जिल्हा परिषदेत निवड झाल्याचे सांगत दोन युवक पोहचले होते.
त्यांच्या पत्रावर तत्कालीन मुख्य कार्यकारी (CEO) अधिकाऱ्यांची संगणीकृत स्वाक्षरी असल्याचे दिसून आले.
परंतु अशी कुणालाही नियुक्ती देण्यात आली नसल्याचे समजताच याचा शोध घेण्यात आला.
बेरोजगारांना देण्यात आलेली नियुक्ती प्रत बनावट (Fake appointment letter) स्कॅनिंगची असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठ (Chief Executive Officer Mithali Seth) यांनी सांगितले.

याप्रकरणी जिल्हा परिषदेकडे आलेल्या तक्रारीवरुन आरोपींनी प्रत्येक उमेदवाराकडून 7 लाख रुपये घेतल्याची माहिती आहे.
एकूण बेरोजगारांची संख्या पाहता हा आकडा 1 कोटी 54 लाखा रुपयांवर जात असल्याचेही मिताली सेठ यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे (Shyam Wakharde) यांनी एका वृत्तवाहिनाला सांगितले, तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने नोकरीचा आदेश देऊन फसवणूक झाल्याची तक्रार जि.प.ला मिळाली.
त्या आधारावर रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात 465,468,479,420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा

Pradhan Mantri Kusum Yojana | ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ शेतकऱ्यांसाठी महत्वाची; जाणून घ्या

Crime News | तेलंगणामध्ये चिमुकलीवर बलात्कार आणि हत्या करणाऱ्या आरोपीचा मृतदेह आढळला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  chandrapur news | fake experience certificate in government job at chandrpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update