Chandrapur News | बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार; घरात शिरुन महिलेवर केला हल्ला

चंद्रपूर (Chandrapur) : पोलीसनामा ऑनलाईन – Chandrapur News |चंद्रपूरमधील सावली (Sawali) तालुक्यातील व्याहाड बुज (Vyahad Buz) येथे घराबाहेर झोपलेल्या महिलेवर बिबट्याने (leopard) हल्ला करुन तिला ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गंगुबाई रामदास गेडाम (Gangubai Ramdas Gedam) (वय ४७) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. ही महिलर व्याहाड बुज येथील मुराड भागात आपल्या पतीसह रहात होती. पती घरात झोपला होता. त्या घराच्या समोरील भागात झोपल्या होत्या. या महिलेचे घर हे गावापासून थोडे लांब व एकाकी आहे. बिबट्याने अगोदर शेळीवर हल्ला करुन तिला ठार केले. त्यानंतर त्याने गाठ झोपलेल्या गंगुबाई यांच्यावर हल्ला केला. त्यांचा आरडा ओरडा ऐकून त्यांचे पती बाहेर आले. तोपर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात गंगुबाई यांचा मृत्यु झाला होता. सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचून त्यांनी या घटनेची माहिती घेतली.
AADHAAR Updates | तुमच्या ‘आधार’सोबत होऊ शकते फसवणूक, रोखण्यासाठी आहेत ‘या’ टिप्स; जाणून घ्या