Chandrapur Police | मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी बाहेर पडलेल्या चंद्रपूरमधील 2 तर यवतमाळमधील एका अल्पवयीन मुलीची पुण्यातून सुटका

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन Chandrapur Police | मैत्रीणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा (warora) तालुक्यातील दोन तर यवतमाळ जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या मुलींची पुण्यातून सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Chandrapur Police) चार जणांना ताब्यात घेतले आहे.

रोहीत गोपाल संगीले ( वय २०), शुभम संजय मानेकर (वय २२ ), प्रमोद मोतीबाबा सोनवने (वय २२), प्रक्षिक विलास भोयर (वय २३, सर्व रा.राळेगांव जि.यवतमाळ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, वरोरा तालुक्यातील १५ वर्षीय दोन अल्पवयीन मुली २७ सप्टेंबरला मैत्रीणीचा वाढदिवस असल्याचे
सांगून घरातून सकाळी निघून गेल्या होत्या. सायंकाळपर्यंत त्या घरी न परतल्याने आई-वडीलांनी त्यांचा शोध घेतल्यानंतर २८ सप्टेंबरला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे (Police Inspector Balasaheb Khade) यांनी सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे
(API Jitendra Bobde), पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे (PSI Sandeep Kapade), सचिन गदादे (Sachin Gadade), अतूल कावळे (Atul Kavle)
यांचे नेतृत्वात चार पथक तयार करून शोध मोहिम सुरू केली.

तपासात या मुलींच्या संपर्कात यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव येथील काही मुले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथक राळेगांवला रवाना झाले.
त्या ठिकाणी पोहोचताच बाबुळगांव (जि. यवतमाळ) येथील एका मुलीचे त्याच दिवशी म्हणजे २७ सप्टेंबरला अपहरण झाल्याची तक्रार दाखल असल्याचे समजले.
दोन्ही घटना एकाचवेळी घडल्याने पोलिसांचा संशय बळावला.
दोन्ही ठिकाणच्या घटनेमागे एखादी टोळी असल्याचा संशय आल्याने त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरविण्यात आले.
तपासात वर्धा जंक्शन येथे पीडित मुली आणि त्यांना घेऊन जाणारे मुले दिसल्याची माहिती मिळाली शिवाय ते पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे
असल्याची माहिती मिळाली त्यानुसार चंद्रपूर पोलिसांचे (Chandrapur Police) एक पथक पुण्यात आले. आणि त्या तीन मुलींची सुटका केली.

 

या कामगिरी पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहायक पोलीस निरीक्षक जितेेंद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे,
सचिन गदादे,अतुल कावळे, पोलीस हवालदार धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, प्रशांत नागोसे, संदीप मुळे, दिनेश अराडे यांचा सहभाग होता.

 

Web Title : Chandrapur Police | a 4 accused arrested by local crime branch of chandrapur police after releasing 3 minor girls from pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! कोरोनामुळे नोकरी गमावणाऱ्या ESIC च्या कर्मचाऱ्यांना मिळणार 3 महिन्यांचा पगार

Hotel and Restaurant Association Western India | राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ रात्री 1.30 पर्यंत वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

Indian Post Recruitment | 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! टपाल विभागात 266 पदांवर भरती; जाणून घ्या