झाडाला लटकलेल्या स्थितीत प्रेमीयुगुलाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहराजवळील पांडऱकवडा शेत शिवारात एका प्रेमीयुगुलाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. सुनिता अमित निले (नकोडा) व राजेश गेडाम अशी या दोघांची नावे आहेत. विशेष म्हणजे दोघांची लग्न झाले असून सुनिताला सहा वर्षांची एक मुलगी आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दोघेही विवाहीत असून दोघांनी एकत्र आत्महत्या केल्याने परिसरात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

सुनिता ही घुग्गुस गावची आहे तर राजेश नागपूरचा रहिवासी आहे. या दोघांचा मृतदेह आज सकाळी एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घुग्गुस पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला. दोघेही विवाहीत असून त्यांची स्वतंत्र कुटुंबे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांची ओळख नागपूर येथे झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये परिचय वाढत गेल्याने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.

रविवारी रात्री राजेश चंद्रपूर येथे आला होता. दोघांची चंद्रपूमध्ये भेट झाली. रात्री साडे दहाच्या सुमारास राजेश आपल्या दुचकीने पांढरकवडा गावाच्या शिवारात आला. त्याने सुनिताला बोलावून घेतले आणि त्यानंतर दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी राजेशची दुचाकी आढळून आली असून पोलिसांनी ती जप्त केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

 

Loading...
You might also like