चंद्रपूर : भरधाव वाहनाच्या धडकेत 2 तरुणांचा मृत्यू

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – दिवसाची सुरुवात होण्याआधीच दोन तरुणांवर काळानं घाला घातला आहे. मॉर्निंग वॉकला निघालेल्या 2 तरुणांना अज्ञात वाहनानं धडक दिल्याची घटना समोर आली आहे. मॉर्निंग वॉक गेलेले असताना ही घटना घडली आहे अशी माहिती आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहराजवळ हा धक्कादायक प्रकार घडला. दोन तरुण मॉर्निंग वॉक करत असताना अचाकन अज्ञात वाहनानं त्यांना चिरडलं आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ब्रह्मपुरी-आरमोरी मुख्य महामार्गावर ही घटना घडली.

समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही मृत युवक हे खरकाडा गावातील आहेत. सदर दोन्ही तरूण नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घेले असताना पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनानं मागून या तरुणांना धडक दिली. वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दोन्ही मृतदेह ब्रह्मपुरी उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले. दरम्यान या अज्ञात वाहनाचा शोध ब्रह्मपुरी पोलीस घेत आहेत. एकाच दिवशी खरकाडा गावातील 2 युवक गेल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहेत.