चंद्रपूर : कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या तरुण डॉक्टरांचा Covid-19 मुळे मृत्यु; नागपूरला नेताना वाटेत घेतला अखेरचा श्वास

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांवर गेले वर्षभर उपचार करणारे कोविड योद्धे म्हणून गौरवलेल्या डॉक्टरांनाचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यु झाला. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महविद्यालयात कार्यरत डॉ. प्रशांत चांदेकर (वय ३५) यांना नागपूरला अधिक उपचारासाठी नेताना वाटेतच वरोराजवळ मृत्यु झाला.

डॉ. चांदेकर हे शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर व औषधी विभागात कार्यरत होते. कोरोनाच्या भीषण काळात त्यांनी अनेक रुग्णांना सेवा दिली. मात्र, त्याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. डॉ. चांदेकर यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ऑक्सिजनची पातळी कमी होत असताना त्यांना महिला रुग्णालयात नेण्यात आले़ तरीही त्यांच्या ऑक्सिजनची पातळी सतत खालावल्याने त्यांना तात्काळ नागपूरला हलविण्यासा निर्णय घेण्यात आला. मात्र वरोराजवळ पोहचताच त्यांचा वाटेत मृत्यु झाला. अवघ्या ३५ व्या वर्षी डॉ. चांदेकर यांचे असे सोडून जाणे अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे.