Chandrasekhar Bawankule | ‘देवेंद्र फडणवीस भाजपा-सेना युतीचे मुख्यमंत्री होणार’ – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrasekhar Bawankule | देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे नेते (Maharashtra Politics) आहेत. ते कोठेही जाणार नाहीत. आगामी काळात फडणवीस भाजपा-शिवसेना युती सरकारचे (BJP-Shivsena Alliance Government) मुख्यमंत्री (CM) असतील, असे आश्चर्यचकीत करणारे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केले आहे. ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने (All India Brahmin Federation) भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (BJP National President JP Nadda) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या मागणीनंतर फडणवीस लवकरच दिल्लीत जाणार, अशी चर्चा सुरू झाली होती. यावर बावनकुळे यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

 

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले, या राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत. पुढेही करत राहतील. ते दिल्लीला जाणार नाहीत. सध्या येत असलेल्या बातम्या काल्पनिक आहेत. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. आगामी काळात ते भाजपा-शिवसेना युती सरकारचे मुख्यमंत्री होतील. आमच्यासारखा कोणताही कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस यांची बरोबरी करू शकत नाही. या राज्याला देवेंद्र फडणवीसच पुढे नेऊ शकतात. त्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन आहे.

 

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने पत्र लिहिले होते. या पत्रात म्हटले होते की, पुण्यातील ब्राह्मण महासंघ 2009 मध्ये काँग्रेसच्या (Congress) सुरेश कलमाडींसोबत (Suresh Kalmadi) होता. 2014 मध्ये अनिल शिरोळे (Anil Shirole) आणि 2019 मध्ये गिरीष बापट (Girish Bapat) यांच्या सोबत होता. त्याचे परिणाम तुमच्यासमोर आहेत. त्यामुळे फडणवीसांसारख्या राष्ट्रीय नेतृत्वासाठी ही सुरक्षित जागा आहे. फडणवीसांना फक्त अर्ज भरायचा आहे. जिंकवण्याचे काम ब्राह्मण महासंघ करणार. (Chandrasekhar Bawankule)

 

या पत्रात पुढे म्हटले होते की, अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee),
नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यानंतर नेतृत्वाची ही परंपरा देवेंद्र फडणवीस कायम राखतील असा विश्वास आम्हाला वाटतो.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही. तरीही राष्ट्रहितासाठी आमचा आग्रह आहे.

 

ब्राह्मण महासंघाच्या या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्ववान नेते असल्याने कर्तृत्वाच्या आधारावरच त्यांचा विचार केला जाणार.
या देशामध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा तसेच मागणी करण्याचा अधिकार आहे. फडणवीस हे जात, धर्माच्या वर आलेले आहेत.

 

Web Title :- Chandrasekhar Bawankule | BJP leader devendra fadnavis next cm of shivsena bjp alliance government said chandrashekhar bawankule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dawood Ibrahim Brother Iqbal Kaskar | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर रुग्णालयात

 

Acidity Problems | अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेमुळे त्रस्त आहात का? करा ‘हे’ 5 घरगुती उपाय, ताबडतोब होईल परिणाम

 

Nilesh Rane | रिफायनरी प्रकल्पावरून निलेश राणेंचा ताफा; राणे म्हणाले – ‘मी हात जोडून माफी मागतो…’