Chandrasekhar Bawankule | ‘अशोक चव्हाण यांनी जो दावा केला आहे त्याचा कट मातोश्रीवर शिजला असेल’, चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

नागपुर : पोलीसनामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना शिवसेनेकडून काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) सोबत आघाडीसाठी प्रस्ताव आसल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये आता भाजप (BJP) नेत्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. अशोक चव्हाण यांनी जो दावा केला आहे त्याचा कट मातोश्रीवर (Matoshree) शिजला असेल. उद्धव ठाकरेंनीच तसं ठरवलं असेल आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) निरोप घेऊन गेले असतील, असं मत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी व्यक्त केलं आहे. तसेच राज्यात भाजप-शिवसेना सरकार असताना एकनाथ शिंदे हे नेते नव्हते. तेव्हा नेते उद्धव ठाकरेच होते. त्यामुळे भाजपसोबत दगाबजाचा निर्णय उद्धव ठाकरेचांच असेल, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केला.

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले, ज्या काळाबाबत अशोक चव्हाण यांनी दावा केला आहे तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे पदच नव्हते. त्यामुळे ते भाजपसोबत दगाबाजीचा विचारही करु शकत नाहीत. मग ते 2014 च्या निवडणुकीचा निकाल असो किंवा 2019 च्या निवडणुकीचा, उद्धव ठाकरे यांची इच्छा भाजपसोबत वेगळे होण्याचीच होती, असाही आरोप त्यांनी केला. खैरे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) फक्त उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळीक साधण्यासाठी असं बोलत आहेत. ते त्यांच्या नजरेत येऊ इच्छितात, असं म्हणत त्यांनी खैरे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

हा काळ नरेंद्र मोदींचा

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या वक्तव्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले,
आता राज्यातील स्थिती बदलली आहे. तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांचा काळ गेला आहे.
सुप्रिया सुळे म्हणतात साहेब बाहेर पडले तर निश्चितच सरकार येते.
मात्र, आता तो काळ गेला असून बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency)
फक्त एक बारामती विधानसभा क्षेत्र सोडलं,
तर इतर पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला आव्हानात्मक परिस्थिती आहे.
आता एकविसावं शतक आहे. पवारांचा काळ संपला, हा मोदींचा (PM Narendra Modi) काळ आहे, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

Web Title :- Chandrasekhar Bawankule | Chandrasekhar Bawankule and other bjp leaders target uddhav thackeray after ashok chavan s statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vinayak Raut Vs Ramdas Kadam | विनायक राऊतांनी रामदास कदमांना डिवचले, म्हणाले – ‘रामदास कदम यांनीच शिवसेनेत गद्दारीची कीड रुजवली’

Chhagan Bhujbal | शाळेत सरस्वतीचा फोटो कशाला? ‘त्या’ वक्तव्यावर छगन भुजबळ ठाम, म्हणाले…

Pankaja Munde | ‘सध्या मी बेरोजगार आहे, त्यामुळे…’, पंकजा मुंडेंच्या नव्या वक्तव्याने पुन्हा चर्चांना उधाण

Ration Card | रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर ! मोदी सरकारने मोफत रेशनसंदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय