Chandrasekhar Bawankule | भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्तांतरानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (State President of BJP Chandrakant Patil) हे मंत्री झाल्याने आता नवीन प्रदेशाध्यक्ष कोण याची जोरदार चर्चा सुरु असताना माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. त्या अनुषंगाने संघटन कौशल्य आणि अनुभवी अशाचीच प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. कालपर्यंत आशिष शेलार यांचे नाव चर्चेत होते मात्र आता बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी निवड करण्यात आली आहे. तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबई भाजपचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.

 

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule ) यांच्या रुपाने भाजपला प्रदेशाध्यक्ष मिळाले तर ओबीसी समाजामध्ये देखील वेगळी भावना निर्माण होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बावनकुळे अ‍ॅक्टीव्ह झाले असून विरोधकांचे मुद्दे ते खोडून काढत आहेत.

 

पक्षावर एकनिष्ठा तर आहेत पण बावनकुळे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.
त्यामुळे त्यांचे विधानपरिषदेच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यात आले.
विधानपरिषदेसाठी अनेकजण इच्छूक असताना बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली.

 

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
यांची मंत्रिमंडळात (Cabinet) वर्णी लागल्याने त्यांच्या जागेवर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule)
यांच्या नावाची चर्चा सुरु झाली.
मात्र आता या शर्यतीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अत्यंत निकटवर्तीय आमदार संजय कुटे (MLA Sanjay Kute) यांचे नाव अचाकन चर्चेत आले.
त्यामुळे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
अखेर बावनकुळे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली आहे.

 

Web Title : –  Chandrasekhar Bawankule | chandrasekhar bawankule as state president of bjp an announcement is likely to be made soon

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा