Chandrasekhar Bawankule | ‘मोदी-शहांबद्दलचे प्रकाश आंबेडकरांचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे मानसिक दिवाळखोरीचे लक्षण;’ चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Chandrasekhar Bawankule | पुण्यातील खडकवासला येथे जाहीर सभेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यावर जोरदार टीका केली होती. बिगर भाजप सरकार जर केंद्रात आले तर मोदी-शहांना तुरूंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. असे वक्तव्य खडकवासला येथील सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी प्रकाश आंबेडकर यांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

 

प्रकाश आंबेडकर यांच्या त्या वक्तव्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत विक्षिप्तपणे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. प्रकाश आंबेडकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल जे बोलले आहेत ते मानसिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. आमच्या नेतृत्वावर टीका टिपण्णी केली तर राज्यभरात निषेध व्यक्त करावा लागेल. अशा वक्तव्यामुळे महाराष्ट्रात जो असंतोष निर्माण झाला आहे, त्याचा उद्रेक होईल.’ असे यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले.

खडकवासला येथील सभेत सत्ताधारी भाजपवर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की,
‘देशाचा मतदार हाच देशाचा मालक आहे. २०२४ मध्ये बिगर भाजपा-आरएसएसचे (BJP-RSS) सरकार येऊ द्या.
नरेंद्र मोदी आणि अमित शहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने या देशाचा मालक असलेला मतदार भीतीपोटी नोकर झालाय आणि नोकर मालक झालाय, अशी परिस्थिती आहे. आगामी कालावधीत ही भीती आपल्याला दूर करायची आहे. आज या सभेच्या ठिकाणी एवढ्या प्रचंड संख्येने आपण जमलो आहोत. जर याचठिकाणी बीबीसीचा वृत्तपट (BBC Documentary) आपण दाखवला असता तर सर्वांनाच पोलीस पकडू शकतील का? जर पकडले तरी एवढ्या लोकांना ठेवायला तुरुंगात जागा आहे का? झुकाने वाला चाहीये, सरकार झुकती है.’ अशी टीका यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर केली होती.

 

Web Title :- Chandrasekhar Bawankule | chandrashekhar bawankule criticized prakash ambedkar for commenting on narendra modi amit shah

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anil Parab | ‘नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्याला बोलवा..;’ म्हणत, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी घेतले म्हाडाच्या सीईओला फैलावर

Maharashtra Cabinet Meeting | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले 15 महत्वाचे निर्णय, जाणून घ्या सविस्तर

Pune Crime News | जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक